Saina Nehwal Divorce : 2 कोटींची कार, 5 कोटींचा व्हिला… सायना नेहवाल किती संपत्तीची मालकीण?

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिचा पती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.

| Updated on: Jul 14, 2025 | 10:01 AM
1 / 10
भारताची फुलराणी अशी ओळख असलेली स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिचा पती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. यामुळे सायना नेहवालच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

2 / 10
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. लग्नाच्या सात वर्षांनी त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने, बॅडमिंटनपटू सायना नेहवालची संपत्ती किती याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

3 / 10
विविध माहितीनुसार, सायना नेहवालची एकूण संपत्ती सुमारे ४० ते ५० कोटी रुपये आहे. ही संपत्ती तिने तिच्या बॅडमिंटन कारकिर्दीतून, विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून (एंडोर्समेंट्स) आणि इतर व्यावसायिक गुंतवणुकीतून मिळवली आहे.

4 / 10
सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत, ज्यात २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक, जागतिक चॅम्पियनशिपमधील रौप्य आणि कांस्यपदके, तसेच अनेक सुपर सिरीज विजेतेपदे यांचा समावेश आहे.

5 / 10
सायना नेहवाल दरवर्षाला साधारण ५ कोटी रुपये कमावते. बॅडमिंटन स्पर्धांमधील बक्षीस रक्कम, ब्रँड एंडोर्समेंट्स, जाहिराती आणि वैयक्तिक गुंतवणूक याद्वारे ती कमाई करते. त्यासोबतच तिने  सायना यांनी नारिक नावाच्या मासिक पाळी स्वच्छतेसंबंधित एका ब्रँडमध्येही गुंतवणूक केली आहे. ती या ब्रँडची अँम्बेसेडर आहे. हा ब्रँड पर्यावरणाला अनुकूल आणि पुन्हा वापरता येण्याजोगे सॅनिटरी उत्पादने बनवतो.

6 / 10
सायना नेहवालचा जन्म हरियाणातील हिसारमध्ये झाला असला तरी, ती लहानपणापासून हैदराबादमध्ये वाढल्या. २०१५ मध्ये तिने हैदराबादमध्ये एक आलिशान घर खरेदी केले, ज्याची किंमत साधारणपणे ५ कोटी रुपये आहे. या घरात सर्व आधुनिक सुविधा आहेत.

7 / 10
सायनाला महागड्या गाड्यांचा खूप शौक आहे. तिच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज एएमजी जीएलई ६३ चा समावेश आहे. ही कार तिने २०१३ मध्ये खरेदी केली असून याची किंमत जवळपास २ कोटी रुपये इतकी आहे. त्यासोबतच एक मिनी कूपर , बीएमडब्ल्यू आणि एक मर्सिडीज बेंज यांचा समावेश आहे.

8 / 10
सायना नेहवालने भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून देशाचे नाव रोशन केले आहे. तिला अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सायनाला २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीमध्ये कांस्यपदक मिळाले. तर २००९ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने गौरविलं. तसेच २०१० मध्ये तिला‘पद्म श्री’ आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

9 / 10
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. या दोघांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये लग्न केले. बॅडमिंटन जगतात त्यांची जोडी नेहमीच एक आदर्श मानली जात होती.

10 / 10
मात्र, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सायना यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हा निर्णय वैयक्तिक आणि परस्पर सहमतीने घेतल्याचे सांगितले आहे, परंतु त्यांनी घटस्फोटाची नेमकी कारणे अद्याप समोर आलेली नाही.