सलमानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

दिग्गज लेखक आणि पटकथालेखक सलीम खान यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

| Updated on: Oct 16, 2025 | 12:09 PM
1 / 5
अभिनेता सलमान खानचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. 'शिवतीर्थ'च्या बाल्कनीत सलीम खान, राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यात चर्चा रंगली.

2 / 5
सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांनी अचानक मनसे अध्यक्षांची भेट का घेतली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच 'शिवतीर्थ'च्या बाल्कनीत त्यांच्यात गप्पा रंगल्याचं पहायला मिळालं.

3 / 5
यावेळी राज ठाकरे यांनी स्वत: सलीम खान यांना 'शिवतीर्थ' निवासस्थान फिरवून दाखवलं. ठाकरे आणि खान कुटुंबीय यांच्यात खूप जुने मैत्रीसंबंध आहेत. याआधी राज ठाकरेंनीही सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती.

4 / 5
राज ठाकरे आणि सलीम खान यांच्या अचानक भेटीमागचं कारण समोर आलं नसलं तरी दिवाळीचं औचित्य साधत ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे. सिनेइंडस्ट्रीतील अनेक मंडळी सतत राज ठाकरेंची भेट घेत असतात.

5 / 5
मराठी कलाविश्वासोबतच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत असतात. राज ठाकरे हे कलाप्रेमी असल्याने अनेक कलाकारांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.