Raja Shivaji : फेटा, तलवार अन् मराठी डायलॉग.. ‘राजा शिवाजी’मधल्या सलमानने जिंकली सर्वांची मनं

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटातील सलमानच्या भूमिकेची आणि लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये त्याने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. सलमानचा हा लूक व्हायरल होत आहे.

| Updated on: May 01, 2026 | 11:28 AM
1 / 5
अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट आजपासून (1 मे 2026) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याला लूक आणि भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर तो लूक समोर आला असून सलमानने या भूमिकेत सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

2 / 5
'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते.

3 / 5
'राजा शिवाजी'मध्ये जिवा महालाच्या भूमिकेत जेव्हा सलमानची एण्ट्री होते, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. भगवा फेटा, हातात तलवार असा दमदार त्याला लूक आहे. 'शिवाजी नाही.. शिवाजी राजं म्हण..' असा डायलॉग त्याच्या तोंडी आहे.

4 / 5
रितेशच्या या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सलमानने त्याच्याकडे आग्रह धरला होता. यामध्ये तुझ्यासाठी कोणतीच भूमिका निश्चित केली नसल्याचं रितेशने म्हणताच सलमानने त्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खुद्द रितेशनेच हा किस्सा सांगितला होता.

5 / 5
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे.

Follow Us