
बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. अनेकजण बिग बॉस हे फक्त विकेंडच्या वारसाठीच बघतात. सलमान खान अनेक वर्षांपासून विकेंडचा वार होस्ट करताना दिसतोय.

बिग बॉस 17 च्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बिग बॉस 17 बद्दल बघायला मिळत आहे.

आता बिग बॉस 17 बद्दल एक अत्यंत मोठी अशी माहिती पुढे येतंय. येणाऱ्या विकेंडच्या वारला सलमान खान हा होस्ट करताना दिसणार नाहीये.

सलमान खान हा विकेंडच्या वारला दिसणार नसल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये एक निराशा ही बघायला मिळत आहे. चाहते नाराज झाले.

सलमान खान पुढचा विकेंडचा वार होस्ट करताना दिसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान चांगलीच भडकला होता.