
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत.

सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. आयुष शर्मा हा अत्यंत आलिशान असे आयुष्य जगतो.

आयुष शर्मा हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. 2018 मध्ये लवयात्री चित्रपटातून त्याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. रिपोर्टनुसार आयुषचे नेटवर्थ 67 कोटी आहे.

2022 मध्ये अर्पिता आणि आयुषने एक आलिशान बंगला खरेदी केला. या बंगल्याची किंमत 10 कोटी आहे. हेच नाही तर आलिशान गाड्यांचेही त्याच्याकडे कलेक्शन आहे.

आयुष याने काही दिवसांपूर्वीच आपल्या नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवलीये. रेंज रोवर यासारख्या गाड्यांचे मोठे कलेक्शन हे आयुष याच्याकडे आहे.