समंथाचा पती राज निदिमोरू आहे तरी कोण? दोघांच्या वयात किती अंतर?

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. दिग्दर्शक राज निदिमोरूशी तिने दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. समंथाचा पती राज कोण आहे आणि या दोघांच्या वयात किती अंतर आहे, ते जाणून घ्या..

Updated on: Dec 01, 2025 | 1:54 PM
1 / 5
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते.

2 / 5
राज निदिमोरूचा जन्म 4 ऑगस्ट 1979 रोजी झाला, तर समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी झाला. म्हणजेच या दोघांच्या वयात सात ते आठ वर्षांचं अंतर आहे. राज निदिमोरूचंही हे दुसरं लग्न आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं.

3 / 5
राज निदिमोरू आणि श्यामली डे यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. राज दिग्दर्शक, लेखक आणि निर्मातासुद्धा आहे. कृष्णा डीकेसोबतची त्याची जोडी लोकप्रिय आहे. या दोघांनी मिळून 'द फॅमिली मॅन' या गाजलेल्या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलंय.

4 / 5
समंथाने 2017 मध्ये नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. समंताने राजसोबत 'द फॅमिली मॅन 2' आणि 'सिटाडेट - हनी बनी' या वेब सीरिजमध्ये काम केलंय.

5 / 5
समंथा आणि राज यांच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांदरम्यान श्यामली डेनं इन्स्टावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 'उतावीळ लोकंच उतावीळपणाने गोष्टी करतात', अशा आशयाची ही पोस्ट होती.