Samantha Baby Shower: समंथाच्या अनोख्या बेबी शॉवरची चर्चा, कला आवरण विधी म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ

Samantha Baby Shower: समंथाने शेअर केलेल्या या खास क्षणांवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या मातृत्वाच्या प्रवासातील हा आध्यात्मिक सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

| Updated on: Sep 16, 2026 | 11:09 AM
1 / 7
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या आयुष्यातील एका नव्या आणि खास टप्प्यातून जात आहे. पती राज निदिमोरूसोबत ती पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच समंथाने पारंपरिक पद्धतीने झालेल्या सीमंतम अर्थात बेबी शॉवर सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या आयुष्यातील एका नव्या आणि खास टप्प्यातून जात आहे. पती राज निदिमोरूसोबत ती पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच समंथाने पारंपरिक पद्धतीने झालेल्या सीमंतम अर्थात बेबी शॉवर सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

2 / 7

या सोहळ्यातील खास विधींनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून ‘कला आवरण’ या विशेष विधीबद्दल समंथाने स्वतः सविस्तर माहिती दिली आहे. या खास सोहळ्यात समंथा पारंपरिक पोशाखात दिसली. फुलांची माळ, साधे दागिने आणि प्रसन्न चेहरा अशा लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

3 / 7

तिच्यासोबत पती राज निदिमोरूही या विधींमध्ये सहभागी झाला होता. फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला. काही फोटोंमध्ये समांथावर पवित्र पाणी अर्पण करताना, तर काहींमध्ये ती डोळे मिटून मंत्रोच्चार ऐकताना दिसतेय.

4 / 7

‘कला आवरण’ किंवा ‘श्री कल्पम’ हा श्रीविद्या परंपरेतील विशेष विधी आहे. या विधीमध्ये देवीच्या 94 कलांचा संबंध गर्भवती महिलेच्या सात चक्रांशी जोडला जातो. पवित्र पाणी आणि मंत्रांच्या माध्यमातून या चक्रांना शुद्ध आणि ऊर्जावान करण्याची धार्मिक संकल्पना या विधीमागे आहे.

5 / 7

या विधीमध्ये गर्भवती महिलेला देवीचं रूप मानून तिचा सन्मान केला जातो. नव्या जीवाला जन्म देणाऱ्या आईकडे ‘सृष्टीकर्ती’ म्हणून पाहिलं जातं, ही बाब समांथाला विशेष भावली. तिच्या मते, हा विधी केवळ गर्भातील बाळासाठी आशीर्वाद देणारा नसून, मातृत्वाच्या नव्या भूमिकेत प्रवेश करणाऱ्या महिलेसाठीही महत्त्वाचा आहे.

6 / 7

अभिषेकानंतर गर्भवती महिलेला श्रीचक्र यंत्राच्या मध्यभागी बसवलं जातं. या यंत्रामध्ये नऊ आवरणं असून त्यांचा आध्यात्मिक प्रवासाशी संबंध जोडला जातो. त्यानंतर देवी खड्गमाला जप केला जातो. या मंत्रोच्चारातून संरक्षण आणि आशीर्वादाची भावना व्यक्त केली जाते, असे समांथाने सांगितले.

7 / 7

समंथाने म्हटलंय की, प्रत्येक विधीचा अर्थ तिला आधी पूर्णपणे माहिती नव्हता. मात्र पुजाऱ्याने प्रत्येक टप्प्याचं महत्त्व समजावून सांगितल्यानंतर या परंपरेमागील विचार तिला अधिक जाणवला. मंत्रांचा नाद, जपातून निर्माण होणारी ऊर्जा आणि पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या परंपरांविषयीही तिने आदर व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us