
Samantha Ruth Prabhu Second Marriage : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने आज सर्वांनाच धक्का दिला. तिने राज निदिमोरुसोबत लग्न केलं. समांथाचं हे दुसरं लग्न आहे. मागच्या काही काळापासून राज आणि समांथा यांच्यात जवळीक वाढली होती. या जोडप्याने सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनमध्ये लग्न केलं.

राजसोबत लग्न करण्याआधी समांथाच साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न झालं होतं. त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडायची. दोघांमध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. 2017 मध्य दोघांनी लग्न केलेलं. पण हळू-हळू गोष्टी बिघडल्या. परस्पर सहमतीने नागा आणि समांथाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघे 2021 साली वेगळे झालेले.

दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घटस्फोटाची घोषणा केलेली. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. मैत्री कायम ठेवू असं दोघे बोलले होते. पण समांथा आणि नागा चैतन्यच लग्न तुटण्यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?

समांथा किंवा नागा चैतन्य दोघांपैकी कोणीच यामागच कारण सांगितलं नाही. पण अनेक रिपोर्ट्स आले, त्यानुसार हेल्थच्या कारणामुळे नागा आणि समांथाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. समांथा आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थमुळे अडचणीत होती. त्यामुळे ती आपल्या पार्टनरला जास्त वेळ देऊ शकत नव्हती.

म्हणून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. परस्पर सहमतीने दोघे विभक्त झालेले. आता समांथाबद्दल बोलायचं झाल्यास तिने राज निदिमोरुसोबत दुसरं लग्न केलं आहे.