Samantha Baby Shower: असं बेबी शॉवर तुम्ही पाहिलं नसेल, समंथाचं अनोखं डोहाळ जेवण; पारंपरिक विधींनी वेधलं लक्ष

Samantha Baby Shower: समंथा आणि राज यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी कोइंबतूरमधील ईशा फाऊंडेशनमध्ये लग्न केलं होतं. आता लग्नानंतरच्या नव्या पर्वात दोघं पालक होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

| Updated on: Sep 15, 2026 | 10:43 AM
1 / 8
Samantha Baby Shower: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील एका खास टप्प्यातून जात आहे. अभिनेत्रीने पती आणि दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत तिच्या बेबी शॉवरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Samantha Baby Shower: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील एका खास टप्प्यातून जात आहे. अभिनेत्रीने पती आणि दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत तिच्या बेबी शॉवरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 8

या फोटोंमध्ये समंथा आणि राज पारंपरिक पद्धतीने केलेल्या एका खास समारंभात सहभागी झालेले दिसत आहेत. समंथाने हा सोहळा सदगुरूंच्या ईशा फाउंडेशनमध्ये केला असून, त्यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक विधींची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

3 / 8

समंथाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये तिचा खास लूक पाहायला मिळतो. होणाऱ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि या खास क्षणातील तिचा उत्साह चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

4 / 8

राज निदिमोरू देखील या सोहळ्यात सामंथासोबत दिसत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

5 / 8

या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ पारंपरिक बेबी शॉवरपुरता मर्यादित नव्हता. समंथाने सांगितलं की, या कार्यक्रमात श्रीविद्या परंपरेशी संबंधित काही विशेष विधी करण्यात आले. विधी करणारे पुजारी हे श्रीविद्या उपासक होते. त्यांनी प्रत्येक विधीचा अर्थ आणि त्यामागचं महत्त्व सामंथाला समजावून सांगितलं.

6 / 8

समंथाने परंपरांविषयी आपला आदर व्यक्त करताना म्हटलं की, प्रत्येक विधीचा अर्थ आपल्याला नेहमीच समजतो असं नाही; मात्र मंत्रोच्चार, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आणि पिढ्यान् पिढ्या जपून ठेवलेल्या प्राचीन परंपरांमध्ये काहीतरी खोल अर्थ असल्याचा तिचा विश्वास आहे.

7 / 8

या सोहळ्यात 'कला आवरण' नावाचा एक विधीही करण्यात आला. या विधीमध्ये देवीच्या 94 कलांचा सात चक्रांशी संबंध जोडला जातो. त्यामुळे समंथाचा हा बेबी शॉवर धार्मिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक रंगाने अधिक खास ठरला.

8 / 8

'माझ्या मनात आपल्या परंपरांविषयी नेहमीच खूप आदर आहे. प्रत्येक विधीमागचा अर्थ मला कदाचित समजत नसेल, पण त्यामागे काहीतरी गूढ आणि सखोल शक्ती कार्यरत आहे, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मंत्रांच्या उच्चारांमध्ये, सामूहिक मंत्रोच्चारातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमध्ये आणि पिढ्यान् पिढ्या अत्यंत काळजीपूर्वक जपल्या गेलेल्या या प्राचीन परंपरांमध्ये काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे,' असं कॅप्शन देत तिने हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us