Sambhaji Chhatrapati: संभाजी छत्रपतींच्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरणार ; तुळजापूरमध्ये पारपडला कार्यक्रम

स्वराज्य संघटना ही शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण , आरोग्य या विषयावर काम करणार आहे. या संघटनेची पाहिली शाखाही नुकतीच उघडण्यात आली आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 10, 2022 | 10:34 AM
1 / 7
तुळजापूर येथील  तुळजाभवानीदेवीच्या साक्षीने व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजी यांनी दिली आहे.

तुळजापूर येथील तुळजाभवानीदेवीच्या साक्षीने व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजी यांनी दिली आहे.

2 / 7

'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाच्या अनावरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंस्फूर्तीने अनेक सहकारी स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते. यासर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

3 / 7

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा #स्वराज्य असे ट्विट करत नुकतेच माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी स्वराज्य संघटनेच्या बोध चिन्हाचे व ध्वजाचे अनावरण केल्याची माहिती दिली आहे

4 / 7

छत्रपती संभाजी यांनी तीन महिन्यापूर्वी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती . तसेच त्यातून राजकीय वाटचला करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

5 / 7

छत्रपती संभाजी यांना शिवसेनेचा पाठींबा न मिळाल्याने राज्यसभा खासदारकिच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. या दरम्यान आरोप प्रत्यारोपाचे मोठे राजकीय नाट्यही रंगले होते.

6 / 7

स्वराज्य संघटनेची घोषणा केल्यानंतर या संघटनेचे बोधचिन्ह काय असावे तसेच ध्वज कसा असावा हे सुचविण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे त्यांनी केले होते.

7 / 7

स्वराज्य संघटना ही शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण , आरोग्य या विषयावर काम करणार आहे. या संघटनेची पाहिली शाखाही नुकतीच उघडण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us