‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट; जय-शरूची पावसातील केमिस्ट्री हिट, प्रोमोवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव

आता जय आणि शरूचं नातं पुढे कोणत्या नव्या वळणावर जाणार, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळू शकेल. 'सनई चौघडे' ही मालिरा दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jul 20, 2026 | 11:24 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे'या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.या मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात आता हळूहळू जवळीक वाढताना दिसत आहे. अलीकडच्या काही घटनांमुळे जयचा शरूवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रॉडक्ट लॉन्चदरम्यान तो तिच्या निर्णयांवर विश्वास दाखवतो. आता दोघं एका ऑफिस पार्टीत जातात, जिथे त्यांना चुकून जोडपं समजलं जातं.

झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे'या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.या मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात आता हळूहळू जवळीक वाढताना दिसत आहे. अलीकडच्या काही घटनांमुळे जयचा शरूवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रॉडक्ट लॉन्चदरम्यान तो तिच्या निर्णयांवर विश्वास दाखवतो. आता दोघं एका ऑफिस पार्टीत जातात, जिथे त्यांना चुकून जोडपं समजलं जातं.

2 / 5

पार्टीतून घरी जाताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात जय शरूचा जीव वाचवणार आहे. या भावनिक आणि अॅक्शनने भरलेल्या प्रसंगांचं शूटिंग कलाकार आणि संपूर्ण टीमसाठी खूप आव्हानात्मक असतं. मालिकेत जयची भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळे याने या पावसातील अॅक्शन सीनच्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.

3 / 5

याविषयी राज म्हणाला, "हा अनुभव खूपच भन्नाट आणि समाधान देणारा होता. पहिल्यांदाच मी रात्रभर पावसात अॅक्शन सीन शूट केला. अशा प्रकारचे सीन करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. अॅक्शन सीनची मला खूप आवड असल्यामुळे मी या सीनसाठी खूप उत्सुक होतो. शूटिंगच्या 10-15 दिवस आधीपासून मी तयारी सुरू केली होती. नियमित वर्कआऊट, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आणि हाय-प्रोटीन डाएट पाळलं. शूटिंगच्या दिवशी तब्बल सहा तास पावसात भिजत फाईट सीन केला."

4 / 5

"प्रत्येक शॉटआधी पुन्हा वर्कआऊट करावं लागत होतं. त्यामुळे रात्रभर शूटिंग आणि वर्कआऊट दोन्ही सुरू होतं. या शूटिंगदरम्यान संपूर्ण टीमने खूप साथ दिली. दिग्दर्शक, फाईट मास्टर्स आणि सहकलाकार यांच्या सहकार्यामुळे इतका कठीण सीन सहज पूर्ण झाला. शूटिंगनंतर मात्र शरीरावर खरचटल्याच्या आणि रॅशेसच्या खुणा दिसल्या, कारण मला शर्वरीला उचलून काही अॅक्शन्स करायचे होते," असं तो पुढे म्हणाला.

5 / 5

"हा सीन जय आणि शरूच्या नात्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. प्रेक्षकांना हा प्रसंग नक्कीच आवडेल, अशी मला खात्री आहे. मला अॅक्शनची खूप आवड आहे आणि भविष्यातही असे अनेक सीन करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा आहे", अशा शब्दांत राजने अनुभव सांगितला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us