
नाग अश्विनने 'कल्की 2998 एडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्यात दीपिकाची मुख्य भूमिका होती. याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी दीपिकाने मानधन वाढवून मागितलं होतं. त्यानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचं कळतंय. तेव्हापासून दीपिका आणि नाग अश्विन यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.

संदीप रेड्डी वांगाने 'स्पिरीट' या चित्रपटासाठी दीपिकाची निवड केली होती. तेव्हा तिने आठ तासांची शिफ्ट आणि मानधन वाढवून मागितलं होतं. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दीपिकाने प्रोजेक्टमधून माघार घेतली. तेव्हापासून संदीप आणि दीपिका यांच्यात मतभेद आहेत.

अभिनेता रणबीर कपूरने एकेकाळी दीपिकाला डेट केलं होतं. परंतु तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने दुसऱ्या अभिनेत्रीसाठी तिची फसवणूक केली होती. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. तेव्हापासून हे दोघं एकमेकांसमोर येणं टाळतात.

अभिनेत्री कंगना राणौत आणि दीपिका पादुकोण यांच्यातही वाद असल्याचं म्हटलं जातं. कंगनाने अनेकदा दीपिकाला टोमणे मारले आहेत. याच कारणामुळे दोघांमध्ये कधीच चांगली मैत्री झाली नाही, असं समजतंय.

अभिनेत्री सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यातही काही खास मैत्री नाही. सोनमने एका मुलाखतीत दीपिकाचा उल्लेख फक्त एक सहकलाकार असा केला होता. तेव्हापासून दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननेही दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून टिप्पणी केली होती. त्यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे. फराहने दीपिकाचा पती रणवीर सिंहलाही अनफॉलो केलंय.