नेहमीप्रमाणे नदीत गळ टाकला अन् नदीत सापडलं असं काही… मच्छीमार झाला मालामाल

सांगलीच्या हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदी संगमावर मच्छीमाराला ४० किलो वजनाचा महाकाय कटला मासा सापडला असून, या माशाची १० हजार रुपयांना विक्री झाली आहे.

| Updated on: May 25, 2026 | 2:10 PM
1 / 6
सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात एक अवाढव्य मासा सापडल्याची थरारक घटना समोर आली आहे. हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर मासेमारी करताना एका स्थानिक मच्छीमाराला तब्बल ४० किलो वजनाचा महाकाय मासा गळाला लागला. हा मासा कटला प्रजातीचा असल्याची माहिती मिळाली असून, त्याला नदीबाहेर काढताना मच्छीमाराची चांगलीच दमछाक झाली.

2 / 6

हरिपूर येथील संगमावर एक मच्छीमार नेहमीप्रमाणे गळ टाकून मासेमारी करत होता. अचानक त्याच्या छडीला मोठा हिसका बसला आणि गळ पाण्यात ओढला जाऊ लागला. पाण्यात काहीतरी मोठा जीव अडकल्याचे लक्षात येताच मच्छीमाराने तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

3 / 6

मात्र, माशाचे वजन आणि ताकद एवढी जास्त होती की त्याला एकट्याला नदीबाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर प्रचंड प्रयत्नांनंतर आणि कमालीच्या दमछाकीनंतर या ४० किलोच्या महाकाय माशाला पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले.

4 / 6

नदीपात्रातून एवढा मोठा मासा बाहेर काढल्याची बातमी वाऱ्यासारखी हरिपूर आणि परिसरात पसरली. या महाकाय माशाला उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी नदीकाठावर स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी मोठी गर्दी केली होती.

5 / 6

एवढ्या अवाढव्य आकाराचा मासा नदीत सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात यापूर्वीही अशा प्रकारे ३० ते ४० किलो वजनाचे मोठे मासे आढळून आले आहेत.

6 / 6

मात्र, बऱ्याच दिवसांनी एवढा मोठा कटला मासा सापडल्याने बाजारातही त्याची जोरदार चर्चा रंगली. नदीतून बाहेर काढल्यानंतर या माशाला स्थानिक बाजारात नेण्यात आले, जिथे त्याला तब्बल १० हजार रुपयांची बोली लागली आणि त्याची विक्री झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us