Sania Mirza Luxury Dubai Home Tour: घटस्फोटानंतर सानिया मिर्झा राहतेय आलिशान घरात, दुबईत जगतेय रॉयल आयुष्य

Sania Mirza Luxury Dubai Home Tour: सानिया मिर्झा टेनिस विश्वातील सर्वात मोठं नाव आहे. दमदार खेळीच्या जोरावर सानिया हिने भारताचं नाव जगभरात मोठं केलं आहे. पण खासगी आयुष्यात तिने चढ - उतारांचा सामना केला आहे. आता सानिया मुलगा इजहान याच्यासोबत दुबईत रॉयल आयुष्य जगत आहे. सध्या तिच्या आलिशान घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 27, 2026 | 12:23 PM
1 / 5
खुद्द सानिया मिर्झा हिने तिच्या आलिशान घराची सफर घडवली आहे. अर्चना पूरण सिग हिने व्लॉगमध्ये

खुद्द सानिया मिर्झा हिने तिच्या आलिशान घराची सफर घडवली आहे. अर्चना पूरण सिग हिने व्लॉगमध्ये

2 / 5

समोर आलेल्या फोटोंनुसार, सानिया हिच्या पाहुण्यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे. फॉर्मल आणि इनफॉर्मल असे दोन प्रकारचे रुम आहेत. फॉर्मल लिव्हिंग रुम पाहु्ण्यासाठी आहे. तर इनफॉर्मल कुटुंबियांसाठी आहे.

3 / 5

सानिया हिने सांगितल्या नुसार, घरात आरामात बसून क्रिकेट सामना आणि टीव्ही शो पाहते. येथे आरामदायक सोफा, फूटरेस्ट आणि टीव्ही कॉर्नर तयार करण्यात आला आहे. खोलीमध्ये सानिया आणि तिचा मुलगा इजहान यांच्या फॅन-मेड फोटो आणि पेंटींग्ज देखील लावले आहेत.

4 / 5

सानिया मिर्झा हिने सांगितले की, घराचं इंटीरियर तिने स्वतः तयार केला आहे. तिने तिच्या पसंतीनुसार प्रत्येक खोलीचे रंग, फर्निचर आणि सजावट निवडली आहे. प्रचंड आलिशान आणि भव्य असं सानिया हिचं घर आहे.

5 / 5

सानियाच्या मते, घर सजवणं ही तिची लपलेली कला किंवा आवड आहे. याच कारणामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिची पसंती आणि पर्सनल टच स्पष्टपणे दिसून येतो. आज सानिया घटस्फोटानंतर एकटीच आयुष्य जगत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us