
अभिनेता संजय दत्त याची मोठी मुलगी त्रिशाला दत्त हिचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असतात. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

त्रिशाला हिचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रयव्हेट असला, तरी तिचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत असतात. संजूबाबाच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील फेल आहेत.

त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते.

आजपर्यंत अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेता संजय दत्त याची मुलगी मात्र झगमगत्या विश्वापासून फार दूर आहे. ती परदेशात तिच्या आजी - आजोबांसोबत राहते.

त्रिशाला वडील संजय दत्त याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. सध्या त्रिशाला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.