
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांनी मंगळवारी सपत्नीक पोहरादेवी दौरा केला. यावेळी संजय राठोड यांची पत्नी शीतल राठोड यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली.

संजय राठोड यांनी पोहरादेवी आल्यानंतर सर्वप्रथम जगदंबा देवीचे दर्शन घेतले.

संजय राठोड घरातून निघाल्यापासून ते प्रसारमाध्यमांसमोर येईपर्यंत शीतल राठोड सतत त्यांच्यासोबत होत्या.

यावेळी शीतल राठोड यांनी संजय राठोड यांना गर्दीतून वाट काढून देण्यासाठी पुढाकार घेतला.

शीतल राठोड यांनी स्वत: पुढे येत कार्यकर्त्यांना बाजूला सारले.

शीतल राठोड यांची संजय राठोड यांना खंबीर साथ.

शीतल राठोड कार्यकर्त्यांना बाजूला सारताना.