
सनई चौघड्यांचे सूर, मंत्रोच्चार अशा भारलेल्या वातावरणात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा पार पडला.

सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला.

यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला.

या वेळी पूर्वशी आणि मल्हार दोघंही प्रचंड खूश दिसले.