
‘सपने सुहाने लडकपन के’ फेम अभिनेत्री रुपल त्यागी हिने लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री होणाऱ्या नवऱ्यासोबत साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून लाईमलाईटमध्ये नसलेली रुपल आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

रुपल त्यागी लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. रुपल त्यागी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये रुपल आनंदी आणि उत्साही दिसत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रुपल हिने नोमिश भारव्दाज नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे… सध्या रुपल हिचे होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो व्हायरल होत आहेत. 5 डिसेंबर 2025 रोजी रुपल हिने लग्न केलं. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

रुपल त्यागी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘हमारी बेटियों का विवाह’ मालिकेत अभिनेत्रीने तिने मनशा कोहलीची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.

एवढंच नाही तर, रूपलने ‘कसम से’, ‘एक नई छोटी सी जिंदगी’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रुपल बॉस सीझन 9 मध्ये देखील स्पर्धक म्हणून चाहत्यांच्या भेटीस आली.