
इंफ्लुएंसर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी ओरी आणि सारा अली खानमध्ये चांगली मैत्री होती. ओरी आणि सारा अली खान हे कॉलेजपासूनचे बेस्ट फ्रेंड्स होते. पण सध्या यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नाहीय. दोघांमधील वाद इतका वाढला आहे की, सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खानने ओरीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलय.

सारा अली खान आणि इब्राहिम अली खानने इन्स्टावर अनफॉलो केल्यानंतर ओरीने सारा अली खानच्या करिअरवर एक कमेंट केली. त्यासाठी ओरीवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली. या वादादरम्यान सारा अली खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया आली आहे. ही Reaction व्हायरल होतेय.

ओरी सोबत वाद सुरु असताना सारा अली खानने आपली पहिली सोशल मिडिया पोस्ट शेअर केलीय. अभिनेत्री थेट या वादावर बोललेली नाही. पण एका गाण्याच्या माध्यमातून तिने आपलं उत्तर दिलय. साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मित्राला बर्थ डे विश केलय. आणि काही फोटोंचा एक कोलाज शेअर केलाय.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये साराने फेमस सिंगर विक्रम सरकारचं गाणं 'नाम चले'लावलय. या गाण्याची शब्दरचना स्वतंत्रपणे जगणं आणि वादांपासून लांब राहण्याबद्दल आहे. साराने ओरीच्या कमेंटवर थेट काही म्हटलेलं नाही. पण गाण्यावरुन याचं कॉन्ट्रोवर्सी संदर्भात तिने हे म्हटल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी ओरीने एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने सारा, अमृता आणि पलक यांचं नाव घेतलं होतं. लोकांनी याचा अर्थ सारा अली खान तिची आई अमृता सिंह आणि अभिनेत्री पलक तिवारीशी जोडला. व्हायरल झाल्यानंतर ओरीने ती रील हटवली. सारा अली खान अजूनपर्यंत जाहीररित्या त्या बद्दल काही बोललेली नाही.