अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात बहीण साराचाच तोरा; सेलिब्रिटींनाही टाकलं मागे

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या लूकने सर्वांचंच लक्ष वेधते. भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात साराचीच जोरदार चर्चा होती. मेहंदी आणि संगीत फंक्शनमध्ये साराचा पोशाख, हेअरस्टाइल, मेकअप आणि सौंदर्य हे सेलिब्रिटींनाही मागे टाकणारं होतं.

| Updated on: Mar 15, 2026 | 3:20 PM
1 / 5
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नुकताच लग्नबंधनात अडकला. सानिया चंडोकशी अर्जुनचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. या लग्नसोहळ्याचे आणि त्यापूर्वीच्या विविध कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नुकताच लग्नबंधनात अडकला. सानिया चंडोकशी अर्जुनचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. या लग्नसोहळ्याचे आणि त्यापूर्वीच्या विविध कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5

लग्नापूर्वीच्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात साराने भरजरी मल्टीकलर लेहंगा परिधान केला होता. लेहंगा आणि ब्लाऊजवर काचेचं सुंदर वर्क करण्यात आलं आहे. पोशाखाला साजेशी अशी हेअरस्टाइल तिने केली आहे.

3 / 5

लग्न जरी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकचं असलं तरी प्रत्येक फंक्शनमध्ये सारा तेंडुलकरच्या लूकचीच जोरदार चर्चा झाली. भावाच्या संगीत फंक्शनमध्ये साराने परिधान केलेल्या या सुंदर लेहंग्याला अर्पिता मेहताने डिझाइन केलं होतं. यात लाल, निळा, गुलाबी, पिवळा, नारंगी, सोनेरी असे सर्व रंग आहेत.

4 / 5

इतकंच नव्हे तर साराने पाहुण्यांसमोर आणि कुटुंबीयांसमोर वहिनी सानियाबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. "सानिया, तू माझी ती बहीण आहेस, जी मला नेहमीच हवी होती पण कधी भेटली नव्हती. आपलं नातं कौटुंबिक नात्यांना दिलेल्या नावांपेक्षा अधिक खोल आणि गहिरं आहे", असं ती म्हणाली.

5 / 5

माझा भाऊ म्हणजे माझं हृदय आहे आणि ते आता तुझं आहे सानिया. त्याची काळजी घे आणि त्याच्यावर खूप प्रेम कर. मला खात्री आहे की तोसुद्धा तुझ्याशी तितक्याच प्रेमळपणे वागणार आणि तुझी काळजी घेणार.. अशा शब्दांत सारा तेंडुलकर व्यक्त झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us