Sara Tendulkar Birthday Special : सारा तेंडुलकरची संपत्ती किती ? कुठून करते कमाई ?

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक, सारा हिनेही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग पासून ते न्यूट्रिशन आणि बिझनेसपर्यंत ती कामात बिझी असते. किती आहे तिचं नेटवर्थ.. कुठून करते कमाई ?

| Updated on: Oct 12, 2026 | 3:57 PM
1 / 9
Sara Tendulkar Net Worth :  क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्याप्रमाणेच, त्याच्या कुटुंबाबद्दलही जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. त्याची लाडकी लेक, सारा तेंडुलकर ही देखील चर्चेत असते. साराचा आज वाढदिवस. तिचं नाव बऱ्याचदा क्रिकेट आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असतं. पण आता, 2026 मध्ये तिची ओळख यापुरतीच सीमित नाही, तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माम केली आहे. मॉडेलिंगने करिअरची सुरूवात केलेल्या साराने आता वेलनेस, न्युट्रिशन आणि बिधनेसच्या जगातही आपली पावलं रोवली आहेत. तिच्या संपत्तीबाबत अधिकृत आकडेवारी सार्वजनिक नसली तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचं नेटवर्थ साधारण 1 ते 1.5 कोटींच्या आसपास आहे.  ( All Images : Instagram)

2 / 9

12 ऑक्टोबर 1997 रोजी सारा तेंडुलकरचा जन्म झाला. आज ती आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची मुलगी म्हणून ओळख असली, तरी साराने शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यावर भर दिला आहे. साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) येथून बायोमेडिकल सायन्सेसचे शिक्षण पूर्ण केले.

3 / 9

त्यानंतर तिने क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. तिच्या शैक्षणिक प्रवासातून आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील तिची आवड दिसून येते. साराची व्यावसायिक ओळखही AFN-नोंदणीकृत असोसिएट न्यूट्रिशनिस्ट अशी आहे.

4 / 9

शिक्षणासोबतच साराने फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रातही आपली वाटचाल सुरू केली. 2021 मध्ये Ajio Luxe च्या एका कॅम्पेनमधून तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती विविध फॅशन आणि लाइफस्टाइल प्रोजेक्ट्समध्ये झळकली.

5 / 9

सारा तेंडुलकरच्या व्यावसायिक कारकिर्दीला 2025 मध्ये नवी दिशा मिळाली. याच वर्षी तिने मुंबईतील अंधेरी येथे Pilates Academy X Sara Tendulkar या पिलाटेस अकादमीची सुरुवात केली. दुबईस्थित पिलाटेस अकादमीसोबत भागीदारी करून सुरू केलेला हा व्यवसाय तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

6 / 9

फेब्रुवारी 2026 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत साराने आपल्या व्यावसायिक प्रवासाबद्दल माहिती दिली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने काही काळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत नोकरी केली. मात्र, पुढे स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.

7 / 9

लंडनमध्ये दुखापतीतून सावरत असताना तिची पिलाटेस या व्यायामप्रकाराशी ओळख झाली. याच अनुभवातून पिलाटेसविषयी तिची आवड वाढली आणि पुढे तिने या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचे पाऊल उचलले.

8 / 9

सारा तेंडुलकरच्या वाढत्या लोकप्रियतेची झलक आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबतच्या तिच्या सहकार्यातूनही दिसून येते. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाने म्हणजेच Tourism Australia ने आपल्या ‘Come and Say G’Day’ या 130 दशलक्ष डॉलरच्या जागतिक जाहिरात मोहिमेच्या भारतीय भागासाठी साराची निवड केली.

9 / 9

सारा तेंडुलकरच्या एकूण संपत्तीबाबत इंटरनेटवर वेगवेगळे दावे केले जातात. काही वृत्तांनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. तर काही अहवालांमध्ये यापेक्षा अधिक संपत्ती असल्याचे दावे करण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us