जगातील एकमेव समुद्र, ज्याला नाही कोणताही किनारा, पाहून वैज्ञानिक पण झाले हैराण, कारण काय?

जगातील एक असा समुद्र, ज्याला नाही कोणताही किनारा. ठिकाण पाहून वैज्ञानिक पण झाले हैराण. काय आहे नेमकं कारण?

| Updated on: May 28, 2026 | 2:31 PM
1 / 5
पृथ्वीवर असा एक समुद्र आहे, ज्याला कोणताही किनारा नाही, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण ही केवळ कल्पना नसून एक वैज्ञानिक आणि भौगोलिक सत्य आहे. अटलांटिक महासागराच्या मध्यभागी वसलेला ‘सरगासो सागर’ हा जगातील एकमेव असा समुद्र मानला जातो, ज्याच्या सीमा जमिनीने नाही तर समुद्री प्रवाहांनी ठरतात.

2 / 5
‘सरगासो सागर’ हा उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी आहे. विशेष म्हणजे या समुद्राला कोणतीही तटरेषा किंवा भौगोलिक सीमा नाही. जगातील इतर सर्व समुद्र हे एखाद्या देश, खंड किंवा बेटांच्या किनाऱ्यांनी वेढलेले असतात. मात्र सारगासो सागराच्या सीमा चार मोठ्या समुद्री प्रवाहांनी निश्चित होतात.

3 / 5
या समुद्राच्या पश्चिमेला ‘गल्फ स्ट्रीम’, उत्तरेला ‘नॉर्थ अटलांटिक करंट’, पूर्वेला ‘कॅनरी करंट’ आणि दक्षिणेला ‘नॉर्थ अटलांटिक इक्वेटोरियल करंट’ वाहतात. या चारही शक्तिशाली प्रवाहांमुळे समुद्राच्या मध्यभागी पाण्याचा एक शांत आणि गोलाकार भाग तयार होतो. त्यामुळे हा समुद्र इतर महासागरांपेक्षा वेगळा ठरतो.

4 / 5
प्राचीन काळात या समुद्राबद्दल अनेक रहस्यमय कथा सांगितल्या जात होत्या. जुन्या काळातील नाविकांना असे वाटायचे की, या समुद्रातील शांत पाणी आणि तरंगणाऱ्या समुद्री गवतामुळे जहाजे अडकून पडतात. काही कथांमध्ये तर जहाजे कायमची गायब झाल्याचेही उल्लेख आहेत. त्यामुळे सरगासो सागरला हरवलेल्या जहाजांचे ठिकाण असेही संबोधले जाते.

5 / 5
मात्र आधुनिक संशोधनानुसार या कथा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. समुद्रातील शांत प्रवाह आणि कमी वारे यामुळे जुन्या काळातील नौकांना पुढे जाण्यास अडचण येत असे. त्यामुळे जहाजे बराच काळ एका भागात अडकून राहायची आणि त्यातून या गूढ कथांचा जन्म झाला.

Follow Us