
अभिनेत्री या कायम त्यांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. तो सतत डायट करत असतात, योग करतात जाणे करुन शरीरयष्टी योग्य राहिल. आता एका अभिनेत्रीने तिच्या फिटनेसविषयी वक्तव्य केले आहे. तिने स्वत:ला थेट हिप्पोपोटॅमस म्हटले आहे.

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत तिचे नाव रागिनी खन्ना आहे. ती छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ससुराल गेंदा फूल’ या टीव्ही मालिकेतील सुहानाची भूमिका साकारली होती. रागिनने स्वतः वजन वाढवण्याच्या आणि नंतर वजन कमी करण्याचा प्रवास एका पॉडकास्टमध्ये सांगितला आहे.

या पॉडकास्टमध्ये ती म्हणाली, कामाच्या ताणामुळे तिची झोप होत नव्हती. त्यामुळे केस पांढरे झाले, चेहरा पांढरा पडू लागला होता, वजन वाढू लागले होते. अभिनेत्रीने सांगितले की ती पीठ किंवा साखर खात नव्हती पण इतकी चॉकलेट खात राहिली की तिला तिचे वजन खूप वाढले आहे हेही कळले नाही.

रागिणी म्हणते, ‘मी स्वतःला कॅमेऱ्यात पाहिले आणि मग मला जाणवले की, ही हिप्पोपोटॅमस मीच आहे. मी इतकी जाड कधी झाली? मी आरतीलाही म्हणाले, मला माफ कर बहिणी, तुझ्या लग्नात मी खूप जाड दिसत आहे. त्यानंतर मला धक्का बसला.'

रागिणीने कॅमेरा फेस करायचा म्हणून जवळपास १५ वर्षे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले होते. पण, लॉकडाउनमध्ये तिने सर्व काही खाण्यास सुरुवात केली.