
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रच्या विकासाची पायाभरणी करण्याचं काम त्यांनी केलं. शिवाय देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी जात त्यांना अभिवादन केलं. स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या समोर अजित पवार नतमस्तक झाले.

साताऱ्यातील कराडमधल्या प्रीतीसंगमावर जात अजित पवार यांनी अभिवादन केलं. त्यांना आदरांजली वाहिली.

सुसंस्कृत महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांनी यांच्यामध्ये व्यवस्थित एकोपा ठेवावा एकमेकांचा आदर करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं असतं, याचा आदर्श चव्हाणसाहेबांनी आमच्या समोर उभा केला, असं अजित पवार म्हणाले.

सुसंस्कृ राजकारणाची मुहूर्तमेढ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी रोवली, असं म्हणत अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.