
पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटे धबधबे वाहू लागला आहे. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. जोरदार पाऊसचे पाणी डोंगरावरुन खाली जाताना पुन्हा वर येते. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासारखे असते.

पाटण तालुक्यात उलटा धबधबा सडावाघापूर येथील धबधब्याची ओळख आहे. या ठिकाणी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे खाली जाणारे पाणी पुन्हा वर येते. त्यामुळे धबधबा खालून वर येत असल्याचे दिसून येते. प्रवाह उलट्या बाजूने जात असल्याचे दिसून येते.

तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर सडावाघापुरला उलटा धबधबा आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर पर्यटक येथील उलटधबधबा पाहण्यास दाखल होतात. यावर्षी आता पर्यंटकांची गर्दी होऊ लागली आहे.

सातारा सडावाघापूर येथील धबधब्यावर जाता येते. मात्र, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी तात्पुरता बंद केला आहे. प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटसह 12 पर्यटन पॉईंटही नगरपालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरते बंद केले आहेत.

महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लिंगमळा धबधबा बंद करण्यात आला आहे. लोणावळ्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.