
पावसाळा सुरु झाली की दरवर्षी विविध धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे सध्या तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना स्वच्छंदीपणे मनमोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करण्याचे ठिकाण म्हणजेच “ठोसेघरचा धबधबा”.

साधारण 350 मीटर उंचावरुन कोसळणारा पांढराशुभ्र ठोसेघरचा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे.

नुकतंच महाराष्ट्राने पर्यटन विभागाने ठोसेघरचा धबधब्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ठोसेघरचा धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्याला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. या निसर्गात प्रसिद्ध ठोसेघर धबधबा जून महिन्यातच फेसाळला आहे

डोंगर दऱ्यांना पालवी आणि पाझर फुटू लागल्याने निसर्ग हिरव्या रंगाने नटला आहे.

दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, साताऱ्याचे निसर्ग पर्यटन बहरते. यंदाही पावसाळा सुरु होऊन अवघे काही दिवस उलटल्यानंतर या ठिकाणच्या पर्यटनस्थळाचे सौंदर्य बहरले आहे.

ठोसेघर धबधबा तारळी नदीवर आहे. जवळपास 150 ते 180 मीटर उंचीवरुन वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे.

या ठिकाणी 3 धबधबे आहेत. यात एक मुख्य, त्यालगतच एक छोटा आणि तिसरा धबधबा या दोन्हीपासून थोडा लांब वाहतो.