ते दृश्य पाहून काळजाचं पाणी पाणी झालं… सयाजी शिंदेंचे स्वप्न जळून खाक! अवघ्या तासाभरात देवराई झाली भस्म

बीड येथील सयाजी शिंदे आणि वनविभागाच्या सहकार्यातून सह्याद्री देवराई प्रकल्पात झाडं लावण्यात आली होती. आता ही झाडे काही तासात जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 6:01 PM
1 / 5
अभिनेते सयाजी शिंदे हे कामयच त्यांच्या सामाजिक कार्यक्रमुळे चर्चेत असतात. सयाजी शिंदे हे वृक्षप्रेमी आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. आता त्यांच्या बीड येथील सह्याद्री देवराईला आग लागली आहे. या आगीत जवळपास दोन एकरमधील झाडे जळून खाक झाली आहेत.

2 / 5
सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्यातून बीडच्या पालवन शिवारातील सह्याद्री देवराई प्रकल्पात झाडं लावण्यात आली होती.

3 / 5
बीड शहरापासून काही अंतरावर सयाशी शिंदे यांनी सह्याद्री देवराई उभारली आहे. येथे हजारो झाडे लावण्यात आली आहेत. झाडांचे योग्य पद्धतीने संगोपन केले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर हिरवळ होती.

4 / 5
पण आज अचानक सह्याद्री देवराईला आग लागली. या आगीत दोन एकरपेक्षा अधिक परिसर जळून खाक झालेला आहे. छोटी झाडे होती ती पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.दोन एकरच्या परिसरात आता केवळ राख उरली आहे.

5 / 5
काही दिवसांपूर्वीच छोटी झाडे लावण्यात आली होती. ती झाले आगित खाक झाली आहे. तर काही मोठ्या झाडांना आगीची चांगलीच झळ लागल्याचे दिसत आहे. काही तासातच सह्याद्री देवराई जळून खाक झाली आहे.