सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराज गायकवाड फिदा, सायलीनेही लाजत ‘दिल’ दिया

अभिनेत्री सायली संजीवने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर ऋतुराजने 'Woahh?♥️' (वोआह) अशी कमेंट केली.

Anish Bendre | Updated on: May 06, 2021 | 10:56 AM
1 / 8
 'चेन्नई सुपरकिंग्ज'चा (Chennai Superkings - CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये होता. आयपीएलला स्थगिती मिळाली, तसा ऋतुराजलाही इन्स्टाग्राम अकाऊण्टवर अॅक्टिव्ह होण्यास वेळ मिळाला.

'चेन्नई सुपरकिंग्ज'चा (Chennai Superkings - CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये होता. आयपीएलला स्थगिती मिळाली, तसा ऋतुराजलाही इन्स्टाग्राम अकाऊण्टवर अॅक्टिव्ह होण्यास वेळ मिळाला.

2 / 8

ऑन फील्ड भल्याभल्यांची विकेट घेणाऱ्या ऋतुराजची ऑफ फील्ड विकेट गेल्याचं दिसतंय. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिच्या फोटोवरील ऋतुराजची कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

3 / 8

अभिनेत्री सायली संजीवने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर ऋतुराजने 'Woahh?♥️' (वोआह) अशी कमेंट केली. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता.

4 / 8

ही कमेंट वाचून दोघांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. कोणी म्हणालं, यांचं जमतंय बहुतेक, तर कोणी सायली रिलेशनशीपमध्ये आहे भाऊ, असं म्हणत ऋतुराजची विकेट घेण्याचा प्रयत्न केला.

5 / 8

सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

6 / 8

सध्या सायली कलर्स मराठीवर 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत काम करत आहे. आटपाडी नाईट्स सिनेमातील तिची भूमिकाही गाजली होती

7 / 8

ऋतुराज जितका मैदानावरील कामगिरीसाठी गाजतो, तितकाच तो आपल्या स्टाईल आणि लूक्ससाठीही प्रसिद्ध आहे.

8 / 8

याआधी ऋतुराजच्या फोटोवरही सायलीने कमेंट केली होती. त्यामुळे दोघांमध्ये आंखो ही आंखोमें बरंच काही होताना दिसतंय

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us