चक्क हिऱ्यांनी भरलेल्या अद्भूत ग्रहाचा शोध, पृथ्वीपासून किती दूर?

सध्या शास्त्रज्ञांना एका अनोख्या ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह हिऱ्यांनी भरलेला आहे, असे सांगितले जात आहे.

| Updated on: Jul 23, 2025 | 1:18 AM
1 / 6
अंतराळात अनेक मोठी रहस्ये दडलेली आहेत. वैज्ञानिकांना रोज अचंबित करून टाकणऱ्या वस्तू आकाशात दिसतात. आता खगोलशास्त्रज्ञांना एक चक्क हिऱ्यांनी भरलेला ग्रह सापडला आहे.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार जेम्स वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून नासाच्या शास्त्रज्ञांना एक अनोखा शोध लागला आहे. त्यांनी एक ग्रह शोधून काढला असून तो हिऱ्यांनी भरलेला असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे हा ग्रह पृथ्वीपेक्षा तब्बल पाच पटीने मोठा आहे.

3 / 6
या ग्रहाचे नाव 55 क्रँकी-ई असे आहे. हा ग्रह सुपर अर्थच्या श्रेणीत मोडतो. या ग्रहाचा बहुसंख्य भाग हा हिरा आणि ग्रॅफाईट यासारख्या पदार्थांनी भरलेला आहे, असे मानले जात आहे. या ग्राहाचे वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे आहे.

4 / 6
या ग्राहच्या भोवती एक खास प्रकारचे वातावरण असू शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. या ग्रहाचे तापमान खूप जास्त आहे. या ग्रहावरचे तापमान 2400 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असे सांगितले जाते.

5 / 6
55 क्रँकी-ई हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल 41 लाईट इअर दूर आहे. या ग्रहावरचे तापमान खूप जास्त असल्यामुळे तो एखाद्या वितळलेल्या लाव्हारसाप्रमाणे दिसतो. त्यामुळे या ग्रहावर जीवसृष्टी नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

6 / 6
टीप- वर दिलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.