
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिचे कपडे, बोल्डनेस आणि फिटनेस यामुळे चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीतही तिचा फिटनेस अनेक तरुण-तरुणींना लाजवणारा आहे.

मलायका अरोरा इतकी सुंदर आणि फिट कशी? असा प्रश्न अनेकांना पडतोय. मलायका अनेकदा जीममध्ये जाताना दिसते. पण त्याचवेळी मलायका योगासनं सुद्धा करते. तिच्या फिटनेसच रहस्य त्यामध्ये दडलेलं आहे.

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर तिच्या योगासनांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती दंड योगा करताना दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दांड्याच्या मदतीने मलायका योगासन करताना दिसतेय.

हा योगा नियमित केल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते. बेली फॅट कमी करणाऱ्या योगासनामुळे पाचन क्रिया सुधारते.

दंड योगामुळे स्नायू मजबूत होतात. दंड योगामुळे रक्ताभिसरणात सुधारणा होते. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचतो.