
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या संपूर्ण इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. दोघेही त्यांच्या बहुप्रतिक्षित 'लाइगर' चित्रपटात एकत्र दिसत आहेत दरम्यान, त्याची लोकप्रियता आणि फॅन फॉलोइंगनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतेच दोघांनी एकत्र फोटोशूट केले. ज्यामध्ये दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर चाहत्यांना आपल्या खेचताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर दोघांचाही स्वतंत्र असा फॅनफॉलोवर आहे. विजय देवरकोंडाच्या प्रत्येक लूकने व अनन्या पांडेही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने नेटकऱ्यांच्या मनावर प्रभाव टाकताना दिसून येतात.

हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकत्याच समोर आलेल्या दोन्ही काळ्या आऊटफीट परिधान केले आहेत.

या फोटो शूटदरम्यान दोघांची जबरदस्त केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. ही छायाचित्रे पाहून 'लाइगर' चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत

अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर विजयसोबत तिचे काही सोलो फोटोही शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या लेहेंग्यातील अनन्याचा अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.