आयुष्याच्या संध्याकाळी गावाने असे काही केले की सारे ज्येष्ठ भारावले

तुम्ही जेव्हा तरूण असता तेव्हा तुमचं मूल्य असतचं.पण, ज्येष्ठ झाल्यानंतर त्या मूल्यात वाढ होते. या मूल्याची योग्य काळजी घेतली पाहिजे.

Govinda Hatwar | Updated on: May 20, 2023 | 6:53 PM
1 / 5
ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाची खाण असतात. अनेक उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा समाजाला होतो.

ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाची खाण असतात. अनेक उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा समाजाला होतो.

2 / 5

सोलापूरच्या माढ्यातील लोंढेवाडी गावच्या ग्रामपंचायतने गावातील ८० ज्येष्ठ मंडळीचा वाढदिवस समारंभ सोहळा साजरा केला. यावेळी ७५ वर्षीय गावातील पुरुष आणि महिलांनी केक कापला.

3 / 5

केक कापताना आणि सत्कार स्वीकारताना ज्येष्ठ नागरिक भारावून गेल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी आमच्या आयुष्यातील हा पहिलाच वाढदिवस साजरा झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

4 / 5

ज्येष्ठ मंडळीचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा आगळावेगळा उपक्रम सोलापूर जिल्हात चर्चेत आलाय. लोंढेवाडी ग्रामपंचयातीने हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

5 / 5

या सत्कार सोहळ्याने ज्येष्ठ नागरिक चांगलेच भारावले. आपण आयुष्यभर केलेल्या कष्टाचं चिज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपली किंमत नव्या पिढीला समजली. यात ते आनंदी होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us