
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण देखील केले. सुहानाचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

आता नुकताच शाहरुख खान याची लेक सुहाना अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्ये दिसली आहे. सुहानाचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. सुहानाच लूक सर्वांना आवडलाय.

सुहाना खान हिने तिचे हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या साडीवर खास फोटोशूट सुहाना खान हिने केल्याचे बघायला मिळतंय. यासोबतच तिने खास ज्वेलरी देखील कॅरी केलीये.

सुहाना खान हिच्या फोटोवर कमेंट करत कोणी गॉर्जियस म्हटले आहे तर कोणी ब्युटीक्विन म्हटले आहे. सुहाना खान हिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

सुहाना खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.