Sharad Kapoor: तू पहिले ठरव तुला पैसे हवेत की फेम; नवा व्हिडीओ पाहाताच शरद कपूरवर नेटकरी संतापले

Sharad Kapoor: सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेता शरद कपूर हा चांगलाच चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकजण त्याच्या मदतीसाठी धावून आले. आता शरद कपूरला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

| Updated on: Nov 18, 2026 | 7:38 AM
1 / 5
'लगान' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शरद कपूर. एकेकाळी त्याने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री चांगलीच गाजवली होती. पण आता शरद कपूरवर कठीण परिस्थिती ओढावली असल्याचे समोर आले आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पायाला झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले आणि त्यामुळे पाळीव श्वानांची काळजी घेता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर अनेकजण त्याच्या मदतीला आले. पण आता शरदला ट्रोस केले जात आहे.

2 / 5

शरद कपूरने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की त्याला फसवण्यात आले. काही लोकांनी त्याला पैसे देऊन संपर्क साधला, बोलणं रेकॉर्ड केलं आणि नंतर पैसे काढून घेतले.

3 / 5

माझ्या काळजी घेणाऱ्यांचा मी खूप आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. पण सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी दाखवल्या जात आहेत. मला पहिले पैसे दिले गेले. नंतर त्यांनी ते परत घेतले. कोण काय करत आहे हे मला कळतही नाही. मला समजत नाही असे शरद कपूर म्हणाला.

4 / 5

शरद कपूरचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील संतापले आहेत. एका नेटकऱ्याने भाई तू एकदा ठरव की तुला काय हवंय? पैसे हवेत की प्रसिद्धी हवी आहे. इतक्या वर्षांनी इंडस्ट्रीमध्ये परत येत आहेस तर तुला नेमकं काय हवं आहे? भाई जर लोक पुढे येऊन मदत करत आहेत आणि चांगल्या व्यक्तीने पैसे हातात पैसे दिले तर बोलायला हवे होते ना. एका रात्रीतून काय झालं? अशी कमेंट केली आहे.

5 / 5

शरद कपूरबाबात कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे मदतीसाठी पुढे आले. अभिनेता सलमान खान, अभिनेता सोनू सूद, काही निर्माते आणि दिग्दर्शकही शरद कपूरच्या मदतीला धावून आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us