
"कांटा लगा" या बॉलिवूडमधील रिमिक्स गाण्याच्या व्हिडीओमुळे रातोरात घराघरांत फेमस झालेली अभिनेत्री, शेफाली जरीवालचे 42 व्या वर्षी निधन झालं. गेल्या आठवड्यात, 27 जून च्या रात्री कार्डिॲक अरेस्टमुळे तिचा जीव गेला. तिच्या अकस्मात निधनामुळे सर्वच हादरले असून कुटुंबियावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेफाली जरीवाला ज्या धर्माचे पालन करायची, भारतात त्या धर्माचे किती लोक राहतात, ते जाणून घेऊया.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये वाढलेली शेफाली हिंदू धर्माची होती आणि तिचे अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमीत हिंदू विधीनुसार करण्यात आले. बिग बॉस 13 सीझनचा विजेता, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यावरही तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये भारतात हिंदू धर्माच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 96.63 कोटी होती, जी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 79.8 टक्के इतकी आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, भारतातील प्रत्येक 100 लोकांपैकी सुमारे 80 लोक हिंदू आहेत.

भारतातील हिंदू धर्म हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वात स्थानिक धार्मिक समूह आहे. वैष्णव, शैव आणि शाक्त पंथांसह हिंदू धर्माचे अनेक अनुयायी आहेत. हिंदू धर्माला "सनातन धर्म" असेही म्हणतात, ज्याचा अर्थ "शाश्वत मार्ग" असा होतो.

2011 सालच्या जनगणनेनुसार, भारतात 96 कोटी 62 लाख 57 हजार 353 हिंदू होते, तर 1951 साली ही संख्या फक्त 30 कोटी 36 लाख 75 हजार 084 इतकी होती. त्यानुसार, भारतात हिंदू धर्माची लोकसंख्या खूप वेगाने वाढत असल्याचे दिसून येते.

एक प्रतिभावान अभिनेत्री असण्यासोबतच, शेफाली जरीवाला खूप धार्मिक होती. बऱ्याचदा शेफाली ही धार्मिक स्थळांना भेट देत असे. फेब्रुवारी 2025 मध्ये, शेफाली जरीवाला ही आदि शंकराचार्य मंदिरातही गेली.