Shefali Shah : पहिलं लग्न फसलं आणि दुसरं…मोहक सौंदर्याने प्रेमात पाडणाऱ्या शेफाली शाह यांची माहिती नसलेली दुसरी बाजू

Shefali Shah : अभिनेत्री शेफाली शाह यांनी नेहमीच पडद्यावर स्ट्राँग वुमनच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. प्रोफेशनलच नाही, पर्सनल लाइफमुळेही त्या चर्चेत असतात. 11 डिसेंबरला शेफाली यांनी पती आणि फिल्ममेकर विपुल शाह यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात दोघे एकत्र डान्स करत होते.

| Updated on: Dec 13, 2025 | 4:38 PM
1 / 5
लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेफालीने पतीसोबतचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्या 25 वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलल्या. शेफाली यांनी आयुष्यात लग्नाच्यावेळी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांना एका फेल मॅरेजमधून सुद्धा जावं लागलं.

2 / 5
गुजराती नाटकांमधून शेफाली शाह यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केलेली. 1996 साली टीव्ही सीरियल 'हसरते'ने  त्यांना ओळख मिळवून दिली. 1998 साली सत्या चित्रपटात गँगस्टर भिखू म्हात्रेच्या पत्नीचा रोल केला. करिअरच्या सुरुवातीला कमी चित्रपट करुनही प्रत्येक भूमिकेतून आपली छाप उमटवली.

3 / 5
नंतर त्यांनी 'मॉनसून वेडिंग', 'गांधी', 'माई फादर', 'द लास्ट लियर', 'दिल धड़कने दो', 'जलसा', 'थ्री ऑफ अस आणि डार्लिंग्स' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. शेफाली शाह यांनी प्रसिद्ध अभिनेते  हर्ष छाया यांच्याशी लग्न केलेलं. पण तीन वर्षात हे नातं तुटलं.

4 / 5
वर्ष 1995 मध्ये शूटिंग करताना शेफाली हर्ष छाया यांच्या प्रेमात पडल्या. दोघांनी 1997 साली लग्न केलं. पण लग्नानंतर हर्ष आणि शेफाली यांच्या नात्यात दुरावा आला. लग्नाच्या 3 वर्षानंतर 2000 साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांचं पहिल लग्न फसलं पण दुसरं लग्न यशस्वी ठरलं.

5 / 5
 शेफाली यांनी फिल्म निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. डिसेंबर 2000 मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मार्या आणि आर्यमन. शेफाली आणि विपुल यांच्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. ही जोडी नेहमीच परस्परांची ताकद राहिली आहे.