
रियलिटी शो बिग बॉसमध्ये शमिता शेट्टी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राकेश बापटच्या प्रेमात पडलेली. दोघे जवळपास वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

अलीकडेच शमिता एका इंटरव्यूमध्ये राकेश बापट सोबतच्या ब्रेकअपवर बोलली. तिने सांगितलं की, तिच्या डोक्यातून लाइफचा तो चॅप्टर संपलाय. शमिता म्हणाली की, तुम्ही जेव्हा एका घरात बऱ्याच दिवसांसाठी लॉक होता. तेव्हा तिथे तशा प्रकारची नाती बनतात.

तुम्हाला आधाराची गरज असते. कमकुवत क्षणी तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या जवळ जाता. पण बाहेरच्या जगात असं होत नाही. पिंकविला सोबत बोलताना शमिता म्हणाली की, आम्ही दोघे खूप वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. माझ्या आयुष्यातील हा चॅप्टर माझ्या डोक्यातून संपून गेलाय.

शमिताने अजूनही लग्न केलं नाहीय. ती तिच्या प्रिन्स चार्मिंगच्या शोधात आहे. तिचं नाव काही काळापूर्वी अभिनेता आमिर अली सोबतही जोडलं गेलं होतं.

दोघे एकत्र लंच डेटला जाताना दिसलेले. आमिर आणि शमिता दोघेही परस्परांचे चांगले मित्र असल्याच सांगतात. आमिर सध्या दुसऱ्या कुठल्या अभिनेत्रीला डेट करतोय.