
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच चर्चेत असते. नुकताच शिल्पा शेट्टी हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टी ही पारंपारिक लूकमध्ये दिसली आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

नुकताच शिल्पा शेट्टी हिला सिद्धिविनायक मंदिराबाहेर स्पाॅट करण्यात आले. यावेळी पापाराझी यांना खास पोझ देताना शिल्ला शेट्टी ही दिसली.

भगव्या रंगाच्या साडीमध्ये शिल्पा शेट्टी हिचा जबरदस्त लूक दिसला. जय श्री राम लिहिलेला ध्वज शिल्पा शेट्टी हिच्या हातामध्ये दिसत आहे.

शिल्पा शेट्टी हिला पाहून लोकांनी मोठी गर्दी केली. शिल्पा शेट्टी हिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.