अमेरिकेत शिवजयंती साजरी, न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा

महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्वत्र आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. अमेरिकेत देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. गेल्या 12 वर्षांपासून छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर व भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी केली जाते.

| Updated on: Feb 19, 2025 | 11:11 AM
1 / 6
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले. पण फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर अमेरिकेत देखील शिवजयंती साजरी करण्यात आली.

2 / 6
यावेळी पारंपारिक वेशभूषेत, शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत शिवभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. न्यूजर्सी येथील 10 महिलांनी लेझीम नृत्य सादर केले...

3 / 6
 कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलं ते रुद्र डान्स अकेडमी तर्फे 22 लहान मुलामुलींनी मिळून शिवछत्रपतींच्या शौर्यावर गतनृत्य सादर केले.

4 / 6
रुद्र डान्स अकेडमी तर्फे 22 लहान मुलामुलींनी मिळून शिवछत्रपतींच्या शौर्यावर गतनृत्य सादर केले. यामध्ये लहानपणापासून शिवबांनी कसे मोघलांना ततोंड दिले, माँसाहेब जिजाऊँच्या प्रेरणेने स्वराज्याची स्थापना केली व आयाबहिणींना समानतेची वागणूक दिली ह्यावर प्रसंग साकारण्यात आले.

5 / 6
शिवाय न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली. न्यूयॉर्क येथील छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष अपार दळवी यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने न्यूयॉर्क शहरातील रस्ता नामकरण करण्यात यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थायी स्वरूपाचे स्मारक व पुतळा न्यूयॉर्क मध्ये उभारण्यासाठी प्रस्ताव मांडला.

6 / 6
एवढंच नाही तर, shivr.AI ह्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून NSO कंपनीतर्फे पोर्टल लाँच करण्यात आले. शिवरायांबद्दलची माहिती 300+ भाषांमध्ये, 150+ देशांमध्ये ह्या पोर्टलद्वारे पोहोचेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.