धक्कादायक! पाकिस्तानी क्रिकेटरवर इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप, जाणून घ्या कोण आहे तो?

पाकिस्तानचा तरुण क्रिकेटपटू हैदर अली याच्याविरोधात मॅनचेस्टर येथे पोलिस तक्रार करण्यात आली आहे. एका मुलीने त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. हैदरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

| Updated on: Aug 08, 2025 | 4:21 PM
1 / 5
पाकिस्तानचा क्रिकेटपटू हे त्यांच्या वागणुकीमुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांचे वागणे सर्वांनाच खटकते. पण यावेळी पाकिस्तानी खेळाडूने केलेले कृत्य हे लज्जास्पद आहे. पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना क्रिकेटपटू हैदर अलीला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.  त्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. आता हैदर आहे तरी कोण आणि त्याच्यावर आरोप काय? असा प्रश्न सर्वांना पडला.

2 / 5
ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी त्यांच्याकडे हैदर अली विरोधात तक्रार आली. एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर अटक करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हैदर अलीला सध्या निलंबित केलं आहे.

3 / 5
पाकिस्तानचा जो खेळाडू याप्रकरणात अडकला आहे, त्याचे नाव आहे हैदर अली. हैदरने पाकिस्तानसाठी 5 एकदिवसीय आणि 35 टी-20 सामने खेळले आहेत. 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 42 धावा केल्या, तर 35 टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून 505 धावा निघाल्या, ज्यात तीन अर्धशतके समाविष्ट आहेत.

4 / 5
फर्स्ट क्लास क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, हैदरने 27 सामने खेळले असून 47.28 च्या सरासरीने 1797 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून पाच शतके आणि आठ अर्धशतके निघाली आहेत.

5 / 5
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 58 सामन्यांमध्ये 37.66 च्या सरासरीने 1996 धावा आहेत, ज्यात दोन शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. हैदरने आतापर्यंत एकूण 164 टी-20 सामने खेळले असून 23.62 च्या सरासरीने आणि 139.35 च्या स्ट्राइक रेटने 3141 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून 17 अर्धशतके निघाली आहेत.