Shraddha Kapoor: जिंकलंस तू.. नऊवारी साडीत श्रद्धा कपूर पोहोचली कोल्हापुरात, घेतलं आई अंबाबाईचं दर्शन

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी ‘ईठा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरात पोहोचली. यावेळी तिने करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं. लाल नऊवारी साडी, पारंपरिक नथ, गजरा आणि कोल्हापुरी चपलांमधील तिच्या मराठमोळ्या लूकने चाहत्यांची मनं जिंकली.

| Updated on: Nov 26, 2026 | 11:51 AM
1 / 6
Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती महाराष्ट्रातील विविध शहरांना भेट देत आहे. नुकतीच श्रद्धाने कोल्हापूरला भेट दिली. यावेळी तिने करवीर निवासिनी आई अंबाबाईचं मनोभावे दर्शन घेतलं आणि चित्रपटाच्या यशासाठी देवीचा आशीर्वाद मागितला.

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती महाराष्ट्रातील विविध शहरांना भेट देत आहे. नुकतीच श्रद्धाने कोल्हापूरला भेट दिली. यावेळी तिने करवीर निवासिनी आई अंबाबाईचं मनोभावे दर्शन घेतलं आणि चित्रपटाच्या यशासाठी देवीचा आशीर्वाद मागितला.

2 / 6

विशेष म्हणजे, यावेळी श्रद्धाचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. तिच्या या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कोल्हापूर भेटीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अंबाबाई मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे.

3 / 6

यावेळी श्रद्धाने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. हातात लाल-हिरव्या बांगड्या, नाकात पारंपरिक नथ, गळ्यात सुंदर दागिने आणि केसांत मोगऱ्याचा गजरा असा तिचा लूक होता. हे फोटो शेअर करत श्रद्धाने, 'आई अंबाबाई, तुझ्या दर्शनासाठी थँक्यू. कोल्हापूर', असं कॅप्शन लिहिलं आहे.

4 / 6

विशेष म्हणजे, तिने कोल्हापुरी चपलांची झलकही चाहत्यांना दाखवली. तिचा हा मराठमोळा साज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'नऊवारीचा साज आणि कोल्हापुरी अंदाज', 'तू साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस', अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

5 / 6

श्रद्धा कपूरने कोल्हापूरला भेट दिल्यानंतर स्थानिक माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापुरात येऊन खूप आनंद झाला. या शहराशी संबंधित लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत, असं तिने सांगितलं. तसंच कोल्हापूरकरांनी आजवर तिच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आगामी ‘ईठा’ चित्रपटालाही असाच भरभरून प्रतिसाद द्यावा, असं आवाहन तिने केलं.

6 / 6

श्रद्धाचा आगामी ‘ईठा’ हा चित्रपट महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशावर आणि ज्येष्ठ लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रद्धा विठाबाईंची प्रमुख भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने लावणीचे प्रशिक्षण घेतलं असून अनेक कलाकारांशी संवाद साधून या कलेचे बारकावे समजून घेतले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us