
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे श्रुती मराठे. तिने 2012मध्ये छोट्या पडद्यावरील 'राधा ही बावरी' या मालिकेत काम करत महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले. अल्पावधतीच श्रुती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. नुकताच तिने धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

श्रुतीला राधा हा बावरी या गाजलेल्या मालिकेमुळे लोकप्रियता तर मिळवून दिली होती. पण या मालिकेमुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.

श्रुतीने एका दाक्षिणात्य सिनेमामध्ये बिकीनवर सीन शूट केला होता. त्यामुळे या मालिकेच्या वेळी तिला त्या सीनवरुन ट्रोल करण्यात आले होते.

श्रुती ट्रोलिंगविषयी बोलताना एका मुलाखतीमध्ये म्हणाली, मला आजही चांगलच आठवतय की 2012मध्ये माझी राधा ही बावरी मालिका आली होती. या मालिकेआधी मी काही तमिळ सिनेमांमध्ये काम केले होते. त्यामधला एका गाजला होता. कारण मी त्यात बिकीनी घातली होती.

पुढे श्रुती म्हणाली, साऊथ सिनेमे आणि आपले सिनेमे यांच्यामधील अंतर आता कमी झाले आहेत. अनेत साऊथचे सिनेमे हिंदीत डब केले जातात. त्यामुळे ओटीटी ते अगदी सहज उपलब्ध असतात पाहण्यासाठी.

आजकाल तुम्ही थिएटरमध्ये गेलात तर सबटायटल्स उपलब्ध असतात. पण 10-15 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मी तेव्हा नवीन होते. कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या पद्धतीने करायच्या याचे मला भान नव्हते. मला आजही मी तो बिकिनी सीन का केला असा मला पश्चाताप नाही असे श्रुती म्हणाली.

पुढे ट्रोलिंगविषयी बोलताना श्रुती म्हणाली की, तो चित्रपट 2010मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा मी बिकिनी घातली किंवा तमिळमध्ये काम केले हे लोकांना माहिती नव्हते.

पण 2012मध्ये राधा ही बावरी मालिका गाजली तेव्हा श्रुती मराठे कोण? हे गुगल केलं. तेव्हा लोकांनी माझे बिकिनी फोटो पाहिले आणि मला ट्रोल करायला सुरुवात केली. राधी ही ब्रावरी असे म्हणत अनेकांनी सुनावले असे श्रुती म्हणाली.