Sachin-Shubman Gill : सचिन तेंडुलकर, अंजली, शुबमन गिल तिघे एकाच फ्रेममध्ये मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सारा कुठे राहिली?

Sachin-Shubman Gill : सध्या विंबलडन 2026 टेनिस स्पर्धा सुरु आहे. त्याचवेळी टीम इंडिया सुद्धा वनडे सीरीजसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. यावेळी विंबलडन पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये क्रिकेट आणि टेनिस यांचा शानदार मेळ पहायला मिळाला.

| Updated on: Jul 11, 2026 | 9:41 AM
1 / 5
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुबमन गिल सेंटर कोर्टवरील प्रतिष्ठित रॉयल बॉक्समध्ये एकत्र दिसले. दोघांनी अलेक्जेंडर ज्वेरेव आणि ब्रिटनचा वाइल्ड कार्ड खेळाडू  आर्थर फेरी यांच्यामधला पुरुष एकेरीच्या सेमीफायनल सामन्याचा आनंद लुटला.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुबमन गिल सेंटर कोर्टवरील प्रतिष्ठित रॉयल बॉक्समध्ये एकत्र दिसले. दोघांनी अलेक्जेंडर ज्वेरेव आणि ब्रिटनचा वाइल्ड कार्ड खेळाडू आर्थर फेरी यांच्यामधला पुरुष एकेरीच्या सेमीफायनल सामन्याचा आनंद लुटला.

2 / 5

सचिन तेंडुलकरने मागच्या काही वर्षात नियमितपणे विंबलडन सामन्यांना हजेरी लावली आहे. टेनिसप्रतीचं प्रेम सचिनने कधीच लपवून ठेवलं नाही. यावेळी शुबमन गिल पहिल्यांदा सचिनसोबत विंबलडनच्या रॉयल बॉक्समध्ये दिसला. सचिनच्या शेजारी पत्नी अंजली तेंडुलकरही होती.

3 / 5

सामन्यादरम्यानचे सचिन आणि गिलचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर दिसली नाही. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या. साराचं नाव शुबमन गिलसोबत जोडलं जातं.

4 / 5

शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकर विंबलडनच्या रॉयल बॉक्समध्ये सामन्याचा आनंद घेत होते. त्यावेळी सारा तेंडुलकर स्पेनमध्ये होती. साराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर मलोरका, स्पेनच्या लोकेशनसह अनेक फोटो शेअर केलेत.

5 / 5

सचिन आणि शुबमन विंबलडनमध्ये पोहोचले पण सारा कुठे राहिली अशी चर्चा सोशल मीडियावर फॅन्समध्ये आहे. सोशल मीडियावर नेहमीच सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या मैत्रीची चर्चा होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us