
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. आता श्वेता पूर्वीप्रमाणे टीव्ही विश्वात सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.

चाहत्यांना कायम फिटनेस गोल्स देणाऱ्या श्वेताची ऑनस्क्रिन सवत देखील फिटनेस आणि ग्लॅमरमध्ये अभिनेत्रीच्या पुढे आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री श्वेता गुलाटी आहे.

श्वेता तिवारीची ऑनस्क्रिन सवत श्वेता गुलाटी हिने फक्त अभिनेत्री नाही तर, खलनायक म्हणून देखील उत्तम काम केलं आहे. 'मैं हूं अपराजिता' मालिकेच गुलाटी हिने श्वेताच्या सवतीची भूमिका बजावली होती.

श्वेता गुलाटी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 46 व्या वर्षात देखील तिचा ग्लॅमर कमी झालेला नाही. सोशल मीडियावर गुलाटी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. दोन घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटी दोन मुलांचा सांभाळ करत आहे.