
मालिका कसौटी झिंदगी की फेम श्वेता तिवारी अनेकदा चर्चेत असते. श्वेता तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आहे. सध्या ती आपल्या स्टाईलनं केपटाऊनचा पारा वाढवत आहे.

टीव्ही अभिनेत्रीची श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. श्वेता अनेकदा आपल्या बोल्ड फोटोंनी तिच्या चाहत्यांना वेड लावते.

श्वेता खतरों के खिलाडीच्या शूटमधून वेळ काढत तिच्या वेगळ्या स्टाईलमध्ये अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे, हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

श्वेता शेवटी सोनीवरील ‘मेरे डॅड की दुल्हन’ या शोमध्ये दिसली होती. या शोला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

श्वेता पती अभिनवसोबतच्या वादामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता तिचे हे क्लासी फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.