
श्वेता तिवारी ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते. श्वेता तिवारी हिचे दोन लग्न झाले असून हे दोन्ही लग्न फार काळ टिकू शकले नाहीत.

श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न राजा चाैधरी याच्यासोबत झाले. पलक तिवारी ही श्वेता तिवारी आणि राजा चाैधरीची मुलगी आहे. श्वेता तिवारीचे दुसरी लग्न अभिनव कोहलीसोबत झाले.

अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी यांचा एक मुलगा आहे, त्याचे नाव रेयांश आहे. नुकताच अभिनव कोहली याने मोठा खुलासा केला. अभिनव कोहली याने श्वेतावर गंभीर आरोप केले.

अभिनव कोहली म्हणाला, माझ्या मुलाला मला नऊ महिन्यांपासून भेटू दिले गेले नाहीये. मी श्वेता तिवारी हिच्या पाया पडायला देखील तयार आहे. पण मला माझ्या मुलाला भेटायचे आहे.

अभिनव कोहली याने आपल्या मुलाला भेटण्यासाठी थेट कोर्टात धाव घेतलीये. अभिनव कोहली याने म्हटले की, एकाच सोसायटीमध्ये राहूनही मला माझ्या मुलाला भेटू दिले जात नाहीये.