
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकले आहेत.

पुण्यातील ढेपे वाड्यात 24 जानेवारीला त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला.

आता हळूहळू सिद्धार्थ आणि मिताली लग्नाचे फोटो व्हिडीओ शेअर करत आहेत.

या दोघांनी आता हळदीच्या डान्सचे काही फोटो शेअर केले आहेत.

दोघांचे हे भन्नाट फोटो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.