भाजणीची चकली करण्याची सर्वात सोपी पद्धत; इतकी खमंग, खुसखुशीत की बाजारातील चकली पण विसराल!
दिवाळी सण आला की गृहीण्यांना फराळाचं वेगळंच टेन्शन असतं. महत्त्वाचं म्हणजे काही करूनही चकली खुसखुशीत होत नाही. यासाठी आता एक सोपी पद्धत वापरून पहा. चकली हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे मात्र ती नीट होत नसल्याने बाजारातून चकली आणली जाते. जर तुम्ही एक खास ट्रीक योग्य पद्धतीने कराल तर भाजणीची चकली खमंग खुसखुशीत होईल. गव्हाचे पीठ, बेसन आणि अमुल बटर वापरून तुम्ही छान भाजणीची चकली तयार करू शकता. जाणून घेऊया सोपी रेसिपी.

भाजणीची चकली बनवण्यासाठी 3 ग्लास गव्हाचे पीठ आणि 1 ग्लास बेसन घ्या. याशिवाय अर्धी छोटी वाटी आलं-मिरची पेस्ट, 2 चमचे तेल, 30 ग्रॅम अमुल बटर आणि चवीनुसार मीठ घ्या. पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार घट्ट ताक आणि योग्य प्रमाणात दहीभाजणीची चकली बनवण्यासाठी 3 ग्लास गव्हाचे पीठ आणि 1 ग्लास बेसन घ्या. याशिवाय अर्धी छोटी वाटी आलं-मिरची पेस्ट, 2 चमचे तेल, 30 ग्रॅम अमुल बटर आणि चवीनुसार मीठ घ्या. पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार घट्ट ताक आणि योग्य प्रमाणात दही वापरा. वापरा.
सर्वप्रथम गव्हाचे पीठ आणि बेसन एकत्र करून कॉटनच्या कपड्यात घट्ट गाठ बांधा. ही गाठ कुकरमध्ये पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्या. त्यानंतर पीठ बाहेर काढून थोडे थंड होऊ द्या.
वाफवलेले पीठ खलबत्त्यात घालून व्यवस्थित कुटून घ्या. त्यानंतर चाळणीच्या मदतीने पीठ चाळून घ्या. यामुळे पिठातील गुठळ्या निघून जातील आणि चकली छान तयार होईल.
आता चाळलेल्या पिठात आलं-मिरची पेस्ट, तेल, अमुल बटर आणि मीठ घाला. त्यात दही आणि घट्ट ताक योग्य प्रमाणात मिसळून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ चकली पाडण्यासाठी योग्य होईल याची काळजी घ्या.
तयार पीठ चकलीच्या साच्यात भरून गोलाकार चकल्या पाडून घ्या. कढईत तेल गरम करून चकल्या मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. मख्खन (अमुल बटर) घातल्याने आणि योग्य मात्रेत दही घातल्याने भाजणीची चकली अगदी खमंग खुसखुशीत होते.