
परीक्षा संपल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांना, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतील. त्यानंतर अनेकांचा ट्रीपचा प्लॅन असेल. यंदा ट्रीपला कुठं जावं? असा विचार करत असाल तर जरा थांबा... ही बातमी वाचा...

आपण ट्रिपला जाण्यासाठी नेहमी बाहेरच्या ठिकांणांचा शोध घेतो. मात्र तुम्ही कधी आपलं कोकण फिरलात का? कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहिलंत का? कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट दिलीत का?

यंदा तुम्ही कोकणात जाण्याचा प्लॅन करू शकता. देवबाग समुद्रकिनारी संगम सीगल बेटावर निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडेल... सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे बेट आहे....

देवबाग समुद्रकिनाऱ्यार तुम्हाला सीगल्स पाहता येतील. कोकणच्या स्वर्गीय निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्रकिनारा तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिला तर यंदा इथं ट्रीपचा प्लॅन करा... यंदाची सुट्टी कोकणात घालवा... कारण येवा कोकण आपलाच असा...