
वयाच्या 37 व्या वर्षी नेहा कक्कड म्युझिक इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव बनलीय. फॅन्समध्ये तिच्या गाण्याबद्दल प्रचंड क्रेझ आहे. 5 सप्टेंबरला नेहा तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ 'पानी में लगाई आग' रिलीज करणार आहे. सॉन्ग रिलीज आधी तिने टीजर शेअर केलाय.

'पानी में लगाई आग' गाण्यात नेहा तिच्यापेक्षा वयाने 12 वर्षाने मोठा असलेला हिरो डिनो मारियोसोबत रोमान्स करताना दिसते. टीजरमध्ये नेहा डिनोसोबत रोमान्स करताना दिसते. पाण्यातील दोघांचा रोमान्स पाहून तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

डिनो आणि नेहाची सिजलिंग केमिस्ट्री पाहून फॅन्ससाठी सॉन्ग रिलीजची वाट पाहणं सुद्धा कठीण बनलय.

टीजरवर कमेंट करताना चाहत्यांनी म्हटलय की, खरच पाण्यात आग लावलीस. दुसऱ्याने म्हटलं गजब केमिस्ट्री आहे. एकाने लिहिलय की, नेहा तू विवाहित आहेस.

काही फॅन्सनी नेहाचे एक्सप्रेशन आणि तिच्या आवाजाच कौतुक केलय. काहींनी डिनोच्या शर्टलेस होण्यावर आश्चर्य व्यक्त केलय. नेहा आणि डिनो मारियो यांची गाण रिलीज होण्याआधीच चर्चा सुरु झालीय.